नागपूर :- नागपूर सीताबर्डी येथील मध्यवर्ती मोरभवन (विस्तारित) बस डेपो येथे गत तीन सप्ताहापूर्वी मुसळधार पावसाने डेपो परिसर पूर्णपणे चिखलमय झालेला होता, त्यामुळे बसेसच्या आवागमनास व प्रवाश्यांना अतिशय गैरसोय झाली होती. दि.12 एप्रिल 2024 रोजी निगम आयुक्तांनी याठिकाणी पाहणी-दौरा करून मनपा हॉट मिक्स प्लान्टच्या कार्यकारी अभियंता यांना डेपो परिसराचे खडकीकरण व समतलीकरण करण्याचे निर्देशित केले. तसेच, डेपोच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारा पासून दुतर्फा रस्त्याची निर्मिती करण्यास सांगितले. तत्कालीनप्रसंगी, मनपाचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता (साबावि) व परिवहन व्यवस्थापक हे देखील उपस्थित होते.
परिवहन विभागाचे समन्वयातून डेपोतील संपूर्ण जागेचे खडीकरण व समतलीकरण मनपा हॉट मिक्स प्लान्ट विभागाचेवतीने नियोजनपूर्वक जलदगतीने करण्यात आले असून बस वाहतूक व्यवस्था सुचारुपणे कार्यान्वित झालेली आहे. तसेच, दोन प्रवेशद्वारापैकी दक्षिणेकडील 12×90 मी. आतीलरस्त्याचे काम आज पूर्ण करण्यात आले असून 12×100 मी. चा दुसरा मुख्यरस्ता व ९ मी. रूंदीचे इतर रस्ते तसेच पावसाळी नालीचे काम देखील लवकरच पूर्ण करण्यासाठी नियोजन हे प्रकल्प सल्लागाराचे मदतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपा हॉट मिक्स प्लान्टचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले आहे.