शिंदे गटाएवढेच अजित पवार गटाचे आमदार, त्यामुळे…, जागा वाटपासंदर्भात छगन भुजबळांचं मोठं विधान

मुंबई :-आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती सरकारकडून जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आलेल्या महायुतीला जागावाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट विधानसभा निवडणुकीकरता ठराविक जागांसाठी अडून बसल्याचं चित्र आहे. यावरून अजित पवार गटाचे आमदार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

समसमान जागा वाटप व्हावं अशी मागणी अजित पवारांनी केली होती. अजित पवारांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे जागा-वाटपात त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. जवळपास शिंदे गटाचे जितके आमदार आले आहेत, तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आलेले आहेत. त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे, असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इकडली तिकडली वित्तंबातमी राज्याच्या राजकारणातली

Tue Dec 26 , 2023
राज्याच्या राजकारणातला एका धाडसी महत्वाकांक्षी मस्तमौला राजकीय नेत्याचा मी नेमका शेजारी आहे, भावी खासदार दमदार मोहित कंबोज यांचा मी शेजारी आहे, अधून मधून बोलणे झाले कि त्यांच्याकडून राजकीय गमती जमती कळतात मात्र त्या लिखाणातून टाळायच्या असतात पण हेच मोहित महाशय त्यांच्या त्या नेत्यासाठी म्हणजे फडणवीसांसाठी काहीही करू शकतात एवढी निस्सीम भक्ती त्यांची फडणवीसांवर आहे…अर्ध्या रात्री कुठलीही रिस्क ते या आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com