आमदार अमोल मिटकरी यांची भिलगाव ग्रामपंचायतला भेट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव गाव नावलौकिक असून या गावात राजकीय दृष्टिकोन बाजूला सारून राजकीय वैचारिकता दूर सारून गावाच्या विकासासाठी एकत्र आल्याची भावना मनात आणून नवनिर्वाचित ग्रा प सदस्य कार्यकारिणी गठीत झाली .अश्या वैचारिक मजबूत असलेल्या ग्रामपंचायतला भेट देत गाव पाहणी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे नागपूर दौऱ्यावर असताना आपला अमूल्य वेळेतून वेळ काढुन भिलगाव ग्राम पंचायतला भेट दिली. विधानपरिषदेचे वर्तमान आमदार अमोल मिटकरी यांनी नागपुर दौऱ्यावर असतांनी भिलगाव गावाला भेट दिली असता सरपंच भावना फलके व ग्रा.पं.कार्यालयद्वारे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. व अमोल मिटकरी यांनी ग्रामपंचायत कार्यप्रणालीचा आढावा घेतला व त्यांचे कडून भिलगाव ग्रा पं. कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच नर्वनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांना पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा देत शासकीय फंडातून रस्ते,नाली व नागरिकांचा व्ययक्तिक सोयीचा सर्व मुलभुत सुविधा पुरवु शकते अशी हमी घेतली. या प्रसंगी सरपंच भावना चंद्रकांत फलके,सचिव पंकज वांढरे, ग्रा.पं.सदस्य शेखर वंजारी, लतेश्वरी काळे,रेनुराणी सोनी, माजी उपसरपंच चंद्रकांत फलके, सामाजिक कार्यकर्ते निखिल फलके, माधव मिटकरी,संजीव कुमार,मनोहर चौधरी, संदीप पाटील, श्याम रेनावा,सतिश चौधरी,अभिमन्यु बांगडकर, वैभव फलके,व ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com