नागपूर :- आमदार ॲड. अभिजित बजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी 13 जुलैला पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील विद्यानगर, गोपाळकृष्ण नगर, विजयालक्ष्मी पंडित नगर, नंदनवन झोपडपट्टी, हसनबाग, रतन नगर, गाडगेबाबा नगर, संकल्प नगर, ऑरेंज नगर चैतन्येश्वर नगर या सर्व वस्त्यामधील मुलभुत सोई सुविधांच्या सदर्भात नेहरू नगर झोन, नागपूर येथील उपायुक्त घनश्याम पंधरे व त्याचे सहकारी जवाहर नायक, झोनल ऑफिसर विठोबा रामटेके, कार्यकारी अभियंता नरेंद्र सिंगणजोडे, ओसीडब्लू झोनल मैनेजर योगेश गुजर यांच्या सोबत आढावा बैठकीच्या माध्यमातुन चर्चा करण्यात आली.
या बैठकीत आमदार अँड अभिजित वंजारी यांनी नेहरू नगर झोन नागपूर येथील उपायुक्त घनश्याम पंधरे यांच्याबरोबर पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील नंदनवन झोपडपट्टी परिसरातील नाल्यावर झाकणे नाहीत. त्यामुळे गडरचे पाणी लोकाच्या घरात शिरते व रस्त्यावर जमा होते, यासोबतच रतन नगर, गाडगेबाबा नगर संकल्प नगर, ऑरेंज नगर चैतन्येश्वर नगर या परिसरात असणारी सफाई कामगाराची कमतरता, परिसरातील साफसफाई वेळोवेळी न होणे याठिकाणी नळाद्वारे येणारे पिण्याचे पाणी गळ येत असून येथील नागरीकांनी त्या पाण्याचा नमुना अधिकारान्यांना दाखवून सुध्दा त्याबाबतीत कुठल्हाही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही आणि हसनबाग येथील गडर लाईनच्या ब्लॉकेजच्या समस्या अश्या सर्व प्रकारच्या मुलभूत सोई सुविधांच्या समस्यांवर चर्चा केली. तसेच या क्षेत्रातील लोकांच्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून मनपा अधिकान्यांद्वारे वारंवार त्या समस्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे याबाबतीत आमदार अँड अभिजित वंजारी यांनी नेहरू नगर झोन, नागपूर येथील उपायुक्त घनश्याम परे यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रलंबित समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.
यावर नेहरू नगर झोन, नागपूर येथील उपायुक्त घनश्याम पंधरे यांनी या सर्व समस्या 15 ते 20 दिवसांच्या आत मार्गी लावू असे आश्वासन आमदार महोदयांना व या बैठकीमध्ये उपस्थित असलेले पुर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीमध्ये पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी ब्लॉक नं. 3. चे अध्यक्ष राजेश पौनीकर, माजी नगरसेविका नयना झाडे नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे महासचिव परमेश्वर राऊत, नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे महासचिव शेख मुजीब वारसी, सारिका दुपारे, नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे सचिव राजु भेंडे, नागपूर शहर कॉग्रेस कमिटीचे सचिव राकेश कनोजे, नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे सचिव उपस्थित होते.