महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नागपुर चे आकाश मडावी

नागपुर :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली ही भारत सरकार मान्य संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी लकी जाधव यांचीनुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमजीभाई दामोर, कार्याध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष फग्गनसिह कुलस्ते, उपाध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केली. जुन १८ ला राज्य स्तरीय कार्यकारणी बैठकीचे आयोजन लकी जाधव राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी नाशिक येथे केले. क्रांतिसुर्य महामानव बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देवुन लकी जाधव यांना नागपुर तर्फ़े शुभकामना दिल्या गेल्या. लकी यांच्या नियुक्ति ने संपूर्ण भारतातील आदिवासी समाज बांधवांना न्याय मिळेल असे आकाश मडावी यांनी आपल्या भाषनात बोलले. नाशिक येथील बैठकीत राष्ट्रीय युवा निरीक्षक म्हणुन नीरज चौव्हान, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष गणेश गवळी, राज्याचे कार्याध्यक्ष आकाश मडावी, महासचिव दारासिंग पावरा, विदर्भ अध्यक्ष संतोष आत्राम, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रामा पथवे यांची निवड करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक योजनांचा लाभ आदिवासी समाज बांधवांना मिळवुन दैण्याचे कार्य आकाश मडावी करतील अशी त्यांनी ग्वाही दिली. आकाश मडावी यांच्या नियुक्तिने महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या बांधवांना एक ऊर्जा निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशचे राज्यपाल यांचे विधि सहायक विक्रांत सिंग कुमरे, नागपुर माजी महापौर संदीप जोशी, समाज सेवक विवेक नागभीरे व सर्व कार्यकर्ता यांनी आकाश मडावी यांना नियुक्ति बद्दल शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धो डाला...अबकी बार जोश में शिंदे सरकार 

Wed Jun 21 , 2023
मंत्री मंडळ विस्तार आणि या पाच मंत्र्यांना वगळणार, अशी पुडी दिव्य मराठीने सोडली चुकून ती लोकांना खरी वाटली आणि या बातमीचा बऱ्यापैकी गाजावाजा होतोय बघताच लोकसत्ता सहित इतर अनेक वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी हि तद्दन मंत्रिमंडळ विस्तार आणि पाच मंत्र्यांना वगळण्याची बातमी उचलून धरली, एवढ्यावरच हि अशी थापाडी मीडिया थांबली नाही तर वगळण्यात येणाऱ्या तथाकथित पाच मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com