मिशन नवचेतना – महानगरपालिका नागपूर च्या मनपा शाळामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात 88 प्राथमिक व 28 माध्यमिक अशा एकूण 116 शाळांचे संचालन करण्यातय येत आहे. या शाळांमध्ये प्राथमिक विभागात 12984 विद्यार्थी तर माध्यमिक विभागात 5189 विद्यार्थी असे एकूण 18173 विद्यार्थी शिक्षण घेतात. मनपाच्या शाळांमध्ये अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेतात. दिवसातील 6 ते 8 तास हे विद्यार्थी शाळेच्या परिसरात असतात. या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन नवचेतना’ ची सुरुवात करण्यात आलेली आहे. मनपा शाळामंध्ये आपल्या पाल्यांचे नाव नोंदवून त्यांच्या सर्वांगीण विकासाठी सर्व सुविधांचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केलेले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये सर्व शाळांचे सखोल सर्वेक्षण करण्यात आले व त्यामधील निरीक्षणे लक्षात घेऊन विकासाचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, 200 पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या 23 शाळांमध्ये दुरूस्ती व सुशोभीकरण करण्या करिता रू. 4.68 कोटी निधी डीपीडीसी मार्फत उपलब्ध करून नवीन सत्रामध्ये मुलांना सुंदर व प्रफुल्लीत व सुसज्ज शाळा मिळणार आहे. सर्व शाळामंध्ये इलेक्ट्रिफिकेशन व आवश्यक सुविधांच्या नूतनीकरणासाठी रू. 1.12 कोटी मंजूर करण्यात आले असून कार्य सुरू करण्यात आले आहे. 23 शाळेतील 128 खोल्या डिजीटल व 7 शाळांमध्ये संगणक लॅब तयार करण्यात येणार आहे. शिक्षकांद्वारे ‘डिजिटल बोर्ड’च्या वापरामुळे विद्यार्थ्यांना Interactive पद्धतीने नियमित शालेय विषय शिकता येतील. या करिता रु. 4. 89 कोटी इतका निधी मान्य करण्यात आलेला आहे.

सीएसआर व्दारे BaLA (Building As Learning Aid) बोलक्या भिंती तयार करण्याचे नियोजित आहे.

मुलांच्या सर्वांगिण विकासाकरीता येत्या शैक्षणिक-सत्रात 200 पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत खेळानुसार क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक व संगणक लॅब असलेल्या शाळेत संगणक शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे.

सफाई कामगार नसलेल्या शाळेत ‘ब्रिक्स’ (BRICKS) कंपनीद्वारे मशीनच्या सहाय्याने 2 पाळीत शाळेची स्वच्छता करण्यात येणार आहे.

● विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्य व आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

● मनपा नागपूर शाळेमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबविणे, शाळेत मुलींची उपस्थिती वाढावी व प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मनपाद्वारे इयत्ता 1 ते 10 च्या वर्गातील मुलींना (75% ते 90% (उपस्थिती करिता) – रु.3000, 90% च्या वर (उपस्थिती करिता) रु. 4000) प्रोत्साहनपर भत्ता व सायकल बँक योजनेअंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गातील 3 km अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलींना सायकल उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी प्रोत्साहन भत्या करिता रु. 2.50 कोटी व सायकल उपलब्ध करण्याकरिता रु. 12.40 लक्ष इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच गरजू विद्यार्थ्याना (मुले) देखील सायकल उपलब्ध करून देण्यासाठी रु. 10 लक्ष तरतूद राखीव ठेवण्यात आली आहे.

● विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी यापूर्वी असलेल्या २१ शाळांव्यतिरिक्त 3 शाळांमध्ये STEM लॅब व 2 माध्यमिक शाळा व 2 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेल्या विज्ञान प्रयोग शाळांचे आद्यवतीकरण करणे प्रस्तावित आहेत. विज्ञान प्रयोग शाळेकरिता रु.1.15 कोटी व STEM लॅब करिता रु. 36 लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

● CSR च्या माध्यमातून शाळामंध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी यासाठी १५ शाळामंध्ये प्रत्येक वर्गखोलीत हँगिंग लायब्ररी व 31 शाळामंध्ये विद्यार्थीनुरूप पुस्तकांचा समावेश असलेला स्वतंत्र लायब्ररी कक्ष तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

● विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा, संगीत, सांस्कृतिक व अभ्यासोत्तर कौशल्यावर आधारित उपक्रम शिक्षणोत्सवाच्या माध्यमातून शैक्षणिक सत्राच्या मध्यात घेण्यात येणार आहे. यासोबतच पालकांचा शाळा सहभाग वाढवा, मनपा द्वारा त्यांच्या पाल्यांच्या उत्थाना करिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी मेगा पालक मेळावा माहे डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे.

● विद्यार्थ्यांमधील कौशल्यविकासाठी नियोजनपद्धतीने विविध उपक्रमाची अंमलबजावणी करीता शिक्षक मित्र द्वारे शैक्षणिक उपक्रमांवर आधारित दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. यामुळे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांना वर्षभर कोणकोणते उपक्रम करायचे आहेत या बद्दल पूर्वसूचना राहील आणि त्यापद्धतीने कार्य करण्यासाठी या शैक्षणिक दिनदर्शिकेची मदत होईल.

● आनंददायी शिक्षणासाठी तसेच सामाजिक व भावनिक कौशल्य विकासासाठी शिक्षक मित्राद्वारे प्रत्येक शनिवारला महिन्यातील विशेष दिवसांवर विविध मनोरंजनात्मक, आधारित कृतीयुक्त उपक्रम यांची महिन्यानुसार पुस्तिका तयार करून सर्व शाळांमध्ये “दप्तराविना शाळा” उपक्रम राबविण्यात येणार आहे.

● विद्यार्थ्यानाच्या मानसिक व भावनिक मदतीसाठी कॉल सेंटर द्वारे मनपा शहरातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सोय करण्यात येणार आहे व मनपातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक समुपदेशनाची सोय करण्याचे विचाराधीन आहे.

● नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील वय ३-५ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अंगणवाडी व बालवाडी यांचे एकत्रीकरण करण्याचे नियोजन सुरु आहे.

● मनपा शाळेतील 2149 बालवाडी विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळवा या करिता दररोज वेगवेगळ्या प्रकारची न्याहरी (Breakfast) देण्यात येणार आहे.

● मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खो-खो, फ़ुटबाँल, व्हॉलीबॉल, कुस्ती, सॉफ्टबॉल, एथलेटिक्स फिटनेस इ. खेळांचे नियोजन करण्यासाठी 10 शाळेच्या मैदानाचे नवीनीकरण प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

याव्यतिरिक्त मनपा नागपूर व आकांशा फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या ६ मनपा मॉडेल शाळेच्या नवीन बांधकामासाठी 21 करोड इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली असून कार्य निविदा स्तरावर आहे. खाजगी शाळेच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत मनपा मॉडेल शाळेचं सर्व सुविधायुक्त बहुमजली इमारत तयार करण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

Tue Jun 25 , 2024
यवतमाळ :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रदाने, वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन अशा योजना राबविण्यात येतात. महाविद्यालयांनी या योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com