पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे मिसींग मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान चे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग मोबाईलचा बुद्धी कौशल्याने, तांत्रिक पद्धतीने शोध घेवून एकुण ४० मोबाईल किंमती अंदाजे ७,६०,०००/- रू. चे हस्तगत केले. दिनांक २५.०९.२०२४ रोजी ११.०० वा. पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अर्जदारांचे एकुण हरविलेले मोबाईल पैकी एकुण ४० मोवाईल त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्याबाबत अर्जदारानी समाधान व्यक्त करून पोलीसांचे मनः पुर्वक आभार मानले. सदरची कामगिरी राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परि. क्र ०२), नागपूर शहर,  सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) नागपूर शहर, वपोनि, कैलाश देशमाने, पो. ठाणे गिट्टीखदान यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. गुन्हे जितेन्द्र बोबडे, पोहवा, गहीनी नागरे, कमलेश शाहु व सायबर मदतनीस पोअं. विक्रमसिंग ठाकुर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परिमंडळ क. ४ अंतर्गत सराईत गुन्हेगार ईसम हद्दपार

Thu Sep 26 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत, प्लॉट नं. २५५, ऊंटखाना, रमाई बौध्द विहारा जवळ, ईमामवाडा, नागपूर येथे राहणारा सराईत गुन्हेगार नामे ऋषी भाऊराव हाडके, वय २२ वर्षे हा आपले परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारपिट करणे, दुखापत करने अशा प्रकारचे गुन्हे करतो. नमुद गुंड प्रवृत्तीचा इसम हा ईतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करतो. त्याची परिसरात दहशत निर्माण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com