नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान चे अधिकारी व अंमलदार यांनी मिसींग मोबाईलचा बुद्धी कौशल्याने, तांत्रिक पद्धतीने शोध घेवून एकुण ४० मोबाईल किंमती अंदाजे ७,६०,०००/- रू. चे हस्तगत केले. दिनांक २५.०९.२०२४ रोजी ११.०० वा. पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अर्जदारांचे एकुण हरविलेले मोबाईल पैकी एकुण ४० मोवाईल त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले आहे. त्याबाबत अर्जदारानी समाधान व्यक्त करून पोलीसांचे मनः पुर्वक आभार मानले. सदरची कामगिरी राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परि. क्र ०२), नागपूर शहर, सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) नागपूर शहर, वपोनि, कैलाश देशमाने, पो. ठाणे गिट्टीखदान यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. गुन्हे जितेन्द्र बोबडे, पोहवा, गहीनी नागरे, कमलेश शाहु व सायबर मदतनीस पोअं. विक्रमसिंग ठाकुर यांनी केली.