अल्पसंख्याक आयुक्तालय लवकरच साकारु – अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार

– हज हाऊसच्या सौंदर्यीकरण कामांचा शुभारंभ

नागपूर :- अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी शासन पातळीवर विविध योजना व सवलती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यादृष्टीने कामकाजात अधिक गती व सुसूत्रतेसाठी लवकरच अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचे सुतोवाच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथील हज हाऊस सौंदर्यीकरण कामाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनिस अहमद, वक्फ मंडळाचे अध्यक्ष आसिफ उस्मान खान यांच्यासह नागपूर वक्फ मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक आयुक्तालय ही काळाजी गरज आहे. याच्या नियोजनासह जिल्हास्तरावरही अधिका-यांची नेमणूक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजातील मुलींना दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विभाग प्रयत्नशील आहे. सर्व योजनांसाठी निधीची तरतूद वाढविण्यात आली असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

मुस्लिम समाजासाठी कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील रिक्त पदावरील भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. नागपुरात साकारण्यात येत असलेल्या ऊर्दू घरासाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून याअंतर्गत विविध आवश्यक विकासकामे करण्यात येतील. यासोबतच पश्चिम नागपुरातील मुस्लिम स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला मतदार जनजागृतीसाठी आजपासून विशेष अभियान

Fri Mar 8 , 2024
नागपूर :- जिल्हयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुक सहभाग अर्थात स्वीप प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष अभियान सुरू असून त्याव्दारे मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मतदारांसाठी ८ मार्च ते १५ मार्च पर्यंत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com