संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11 :- नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखवल्या आहेत . तेव्हा भाजप च्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन कुमार जिंदल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी एमआयएम चे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शकिबुर रहमान यांच्या नेतृत्वात नवीन कामठी पोलीस स्टेशन चे एसीपी संतोष खांडेकर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी शिष्टमंडळात फैय्याज अहमद,मज़ाहिर अनवर,मोहम्मद आरिफ,इस्माईल पटेल,रिजवान परवेज,मोहम्मद तस्लीम,इनाम अंसारी,नसीरुद्दीन महमूद,मोहम्मद नदीम, अब्दुल ख़ालिक़ , सिकंदर शेख यासह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नुपूर शर्मा -नवीन जिंदल विरुद्ध एमआयएम चे सामूहिक निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com