*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• महालक्ष्मी स्थापनेच्या शुभ दिवशी कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत
नागपूर :- गणेशोत्सवा निमित्य नागपूरकरांना कॉटन मार्केट स्टेशन निमित्य भेट मिळाली असून महालक्ष्मी स्थापनेच्या शुभ दिवशी सदर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.कॉटन मार्केट मेट्रो स्टेशनला रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र महा मेट्रोला प्रदान केले असून दिनांक २१ सप्टेंबर २०२३ पासून मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
आता ३७ मेट्रो स्टेशन स्टेशन वरून सुटणार मेट्रो ट्रेन:
सीएमआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ३६ मेट्रो स्टेशनच्या ऐवजी आता ३७ मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन मार्गिकेवरील १७ मेट्रो स्टेशन व अँक्वा लाईन मार्गिकेवरील २० मेट्रो स्टेशन) येथून मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध असतील. कॉटन मार्केट स्टेशन परिसरात भाजी मार्केट,रेल्वे स्टेशन,मॉल, शासकीय कार्यालय, तसेच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्टेशनचा परिसरातील नागरिकांना निश्चितच लाभ होणार आहे. उल्लेखनीय आहे कि, कॉटन मार्केट मेट्रो स्टेशनला लागूनच कॉटन मार्केट भाजी मार्केट असून दररोज हजारोच्या संख्येत नागरिक याठिकाणी खरेदी करता येत असतात.
महत्वपूर्ण म्हणजे १८ सप्टेंबर २०२३ पासून महा मेट्रोने मेट्रो फेऱ्या मध्ये वाढ करत दर १० मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध केली असून कॉटन मार्केट स्टेशन सुरु झाल्याने आणखी मोठा फायदा मेट्रो प्रवाश्याना होणार आहे.
• गणपती बाप्पाचे आगमन मेट्रोने : आज पासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या घरी गणपतीची स्थापना करतात मेट्रो प्रवाश्यानी मेट्रो सेवेचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात गणपती मेट्रोमधून घरी घेऊन आल्याचे निदर्शनास आले.