भंडारा :- रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणा-या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतक-यांना माहिती व्हावी याकरीता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच सन 2024 मध्ये रेशीम उद्योग करण्याकरीता इच्छूक लाभार्थींची नाव नोंदणी करण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत महारेशीम अभियान -2024 राबविण्यात येणार आहे.
त्याअंतर्गत सदर अभियान भंडारा जिल्हयात सुध्दा राबविण्यात येत आहे. रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास जिल्हयात भरपूर वाव आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांचा आर्थिक स्तर व जिवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. परंतू शेतक-यांना उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापक प्रकरणात जनजागृती करणे आणि तुती लागवड करण्यासाठी शेतक-यांची नोंदणी करणे या दुहेरी उददेशाने राज्यात ‘महारेशीम अभियान’ राबविले जाते.
तुती रेशीम उद्योग करणारे शेतक-यांना तुती लागवड, किटक संगोपन साहित्य व किटक संगोपनगृहाकरीता मनरेगा अंतर्गत 3,58,900/- व सिल्क-समग्र योजनेअंतर्गतही तत्सम अनुदान आहे. या वर्षात सदर अभियान 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत भंडारा जिल्हयासह संपूर्ण राज्यात राबविले जाणार आहे.
या अभियाना अंतर्गत रेशीम शेती म्हणजे काय, या शेतीचे महत्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उद्योगाकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून रेशीम उद्योगाकरीता इच्छूक लाभार्थ्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे,
तेव्हा शेतक-यांनी नाव नोंदणी करीता सदर कालावधीत जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा पत्ता – मदान निवास, डॉ. डोकरीमारे हॉस्पीटलच्या मागे, राजीव गांधी चौक, भंडारा येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी माधव डिगुळे यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक :- 9423017400 / 9028633672 / 9689071982 / 7798091049 / 902168646