नागपूर :- महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना पूरक पोषण मिळावे हा ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या व्यापक उद्देशापैकी एक महत्वाचा उद्देश सफल होत असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. ध्येयपूर्ती करिता शासनाने सजगतेने व जलद गतीने योजनेची सूत्रे हाताळली. आणि याचे सुपरिणामही बघायला मिळत आहेत. महिला-मुलींच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू पाहून उद्देश्यपूर्तीच्या दिशेने योजनेची वाटचाल होत असल्याचे आजूबाजूला पदोपदी उदाहरणे दिसून येत आहेत.
यात ठळक शोभावे असे नागपूर येथील कामठीच्या पंचफुला पाटील यांचे उदाहरण. काबाळकष्ट करून प्रपंच पुढे घेवून जाताना मतिमंद मुलीची जबाबदारीही त्यांच्यावर आली. यात भर म्हणून स्वतःच्या आरोग्याच्या समस्यांचा ससेमीरा सुटत नसल्याने त्या चिंतीत आहेत. तुलनेने पंचफुला यांचे कमाईचे साधन तुटपुंजे अर्थात भांडे विकून त्या आपला निकराचा जीवन प्रवास करीत आहेत. अशात त्यांना मोलाची साथ मिळाली ती ‘..लाडकी बहीण योजने’ची.
स्वतः सोबत आपल्या मुलीची काळजी घेण्याकरिता या दोघींना योजनेतून प्रत्येकीच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा निधी जमा झाल्याचा आनंद व समाधान अवर्णनीय असल्याचे पंचफुला सांगतात. आपल्या सारख्या असंख्य महिलांच्या जीवनाला एक प्रकारे संजीवनी प्रदान करणारी ही योजना असल्याचे सांगून मतिमंद मुलीच्या संगोपनासही या योजनेमुळे मोठी मदत होणार असल्याचे त्या सांगतात.