यवतमाळ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ विधानसभा मतदारसंघांतर्गत यवतमाळ तालुक्यातील सर्व कोतवाल, पोलिस पाटील, तलाठी यांची संयुक्त सभा तहसिलदार डॉ.योगेश देशमुख यांनी नुकतीच घेतली.
यवतमाळ तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील तसेच दारव्हा तालुक्यातील 40 गावातील मतदार केंद्रावरील कार्यरत कोतवाल, पोलिस पाटील व तलाठी यांची संयुक्त सभा घेण्यात आली आहे.
सभेमध्ये तहसिलदार डॉ.योगेश देशमुख यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, मतदान जनजागृती, मतदान चमुना आवश्यक ते सहकार्य करणे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. या सभेस कोतवाल, पोलिस पाटील, तलाठी उपस्थित होते. सभेला तहसिल कार्यालयातील निवडणूक नायब तहसिलदार राजेश कहारे उपस्थित होते.