संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील मराठा चौकातील एस के इंजिनिअरिंग वर्क्स नामक कुलूपबंद वर्कशॉप मधून अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन अवैधरित्या प्रवेश करून वर्कशॉप मधील ट्रकच्या चार बॅटऱ्या,दोन ग्रेण्डर,वेल्डिंग केबल,लोहा,स्टील चे 15 पट्टे असा एकूण 1 लक्ष 34 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी बलबीरसिंग सोखी वय 63 वर्षे रा टेका नाका नागपूर ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 380,454,457 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.