माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी ;खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…

दरवर्षी जयंती साजरी करण्याबाबत कायमस्वरूपी महामानवांच्या प्रकाशित होणार्‍या यादीत समावेश करावा…

मुंबई  :- ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी आहे. माता रमाई यांची ७ फेब्रुवारी रोजी जयंती असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करुन माता रमाई यांचे स्मरण करतात असेही निवेदनात म्हटले आहे.

समाधानाची, सहकार्याची आणि सहिष्णुतेच्या मूर्ती असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नवीन पिढीला मार्गदर्शक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने यावर्षीची त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी विनंती करतानाच संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई याची जयंती दरवर्षी साजरी करण्याबाबत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावा अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

...तर सोमय्यांना देशभरातून राष्ट्रीय मराठी मोर्चाचा पाठिंबा! वाढीत गुन्हेगारी,महिला अत्याचार विरोधात जनआंदोलन उभारा - आनंद रेखी

Mon Feb 6 , 2023
मुंबई :- वाढती गुन्हेगारी तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देशव्यापी अभियान राबवावे,असे आवाहन राष्ट्रीय मराठी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद रेखी यांनी रविवारी केले. सोमय्यांनी हे अभियान राबवले तर राष्ट्रीय मराठी मोर्चा त्यांना देशभरातून जाहीर समर्थने देईल, असे देखील रेखी यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक नेते, माजी मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून सोमय्या यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com