सोलर रूफ टॉप साठी महावितरणची जनजागृती

नागपूर :- केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्याला सौर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहेजिल्ह्यातील बहुतांश घराच्या छतावर सोलर रुफ टॉप असावे यासाठी ग्राहकांसोबत थेट संवाद साधून त्यांना यासाठी प्रोत्साहीत करण्याची मोहीम महावितरणे सुरु केली आहे. वीज ग्राहकांच्या फ़ायद्यासोबतच पर्यावरण पुरक असलेल्या या मोहीमेत सहभागी होत अधिकाधिक नागपूरकर वीज ग्राहकांनी घराच्या छतावर सोलर रुफ टॉप बसविण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले असून यासाठी ठिकठिकाणी जनजागृती मेळाव्यांचे आयोअजन देखील करण्यात येत आहे.

या मेळाव्यात छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र बसवून वीज निर्मिती इकरण्याचे फ़ायदे, हे संयंत्र बसविण्यासाठी मिळणारे अनुदान तसेच ही यंत्रणा बसविण्याच्या कार्यपद्धतीची संपुर्ण माहिती उपस्थितांना विस्तृतपणे दिल्या जात आहे. महावितरणच्या मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे यांनी त्यांच्या सहका-यांसमवेत चारगाव दफ़ाई येथील सरपंच आणि गावक-यांना जनजागृती मेळाव्याच्या माध्यमातून माहिती दिली. याशिवाय रामटेक उपविभागातील सर्व अभियंते आणि कर्मचा-यांना देखील सौर ऊर्जेची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे समजावून सांगितले. नागपूर शहरातील गांधीचौक, सदर येथे एमआरएस उपविभागातर्फ़े देखील मेळाव्याचे आयोजन करुन अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर यांनी तेथे उपस्थितांना सौर ऊर्जेचे महत्व विषद केले. त्रिमुर्तीनगर उपविभागातील यशोदा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या मेळाव्याला संबोधित करतांना अतिरिक्त कार्यकारी रमेश नागदेवते यांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले. गांधीबाग उद्यानात भल्या पहाटे फिरायला येणा-यांना सौर ऊर्जा निर्मिती आणि त्याचा वापर याबाबत महावितरणच्या रिपब्लीक शाखा कार्यालयातर्फ़े मार्गदर्श करण्यात आले.

पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजना

पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र शासनातर्फ़े पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली ॲप ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक ग्राहकांनी या ॲपवर नोंदणी करावी. या योजनेत 3 किलोवॉट पर्यंत अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे. ज्यात प्रथम 2 किलोव्हॅट पर्यंतच्या प्रणालीसाठी 30 हजार रुपये प्रति किलोवॅट तर पुढिल एका किलोवॉटसाठी 18 हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या ॲपवरुन अधिकाधिक ग्राहकांनी नोंदणि करुन या योजनेत सहबागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विप्स डब्लूसीएल को मिला ‘सर्वोत्कृष्ट उद्यम अवार्ड’

Sun Feb 18 , 2024
नागपूर :- फोरम ऑफ़ वुमेन इन पब्लिक सेक्टर (विप्स), डब्लूसीएल को वर्ष 2023 के दौरान उत्कृष्ट कार्य के लिए मिनी रत्न कंपनियों की श्रेणी में ‘सर्वोत्कृष्ट उद्यम अवार्ड’ से नवाज़ा गया I यह पुरस्कार, दिनांक 12.02.2024 को हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड मैनेजमेंट अकादमी, बेंगलुरु में आयोजित, विप्स के 34 वे राष्ट्रिय सम्मेलन के दौरान, मैसूर की महारानी प्रमोदा देवी वाडियार के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com