संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी एका विवाहित तरुणाने घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव सचिन नंदेश्वर वय 40 वर्षे रा कामगार नगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच एपीआय यावले यांनी सहकारी पोलिसांसह त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही. पोलिसांनी यासंदर्भात तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.