भाजयुमो उद्योजक विकास मंचाच्या Logo चे अनावरण..!

नागपूर – भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन काल उद्योजक विकास मंचाच्या लोगोचे अनावरण झाले. काही दिवासांच्या अगोदरच भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतुन भाजयुमो उद्योजक विकास मंचाची स्थापना करण्यात आली आहे. आता ५० पेक्षा अधिक युवा उद्योजकांनी मंचाचे सभासत्व स्विकारलेले आहे. मंचाच्या माध्यमातुन समान विचारधारेतील तरूण एकत्रित येऊन नव-नविन उद्योग सुरू करतील तसेच नवीन उद्योगांना व उद्योजकांना प्रोत्साहन देतील. काल गणेशपेठ, नागपुर येथील ब्रिज इन हॅाटेल येथे मंचाचे सत्र पार पडले. या सत्राला प्रामुख्याने प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे, स्पेसवुड फर्निचर्स उपस्थित होते. या वेळेला त्यांनी आपल्या व्यवसायिक कारकीर्दी बद्दल माहिती दिली व युवकांना व्यवसायात नव-नवे प्रयोग करण्याचे मार्गदर्शन केले. इनोव्हेशन, स्किल्स्, टेक्नोलोजीचे महत्व पटवुन दिले.

 

यावेळी प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या समवेत भाजयुमो उद्योजक विकास मंचाचे अध्यक्ष सुलभ देशपांडे, उपाध्यक्ष प्रणव घुगरे, सरचिटणीस आशय नलमवार, चंद्रभुषण महंकाळ, सौरभ जंगशेट्टीवार, अभिजीत पौनिकर, कोषाध्यक्ष पदी गौरव टांगसाळे, सह- कोषाध्यक्ष राहुल गुप्ता प्रामुख्याने अपस्थित होते.

सोबतच कपिल जोशी, अभिषेक काणे, सुधांशू प्रतापे, यश साबू, अथर्व गोगायन, मंदार काथोटे, वैभव सावरकर, यश पालटेवार, प्रणव पाटील, तेजस्विनी भांडारकर, रवी भांडारकर, श्रेयांश शाहू, सुमित खुणे, गोपी मोरघडे, दिनेश धोटे, निहाल वारगंटीवार, अनिकेत ढोले, अभिजीत पौनीकर, हृषीकेश देशपांडे, भक्ती आमटे, अमन पवार, कुणाल पाटील, भावना जनबंधु, अभिजीत पोटे, अमोल हरिदास, राधा नानोटी-ओक, भूषण जोशी, आदित्य ढेंग्रे, गौरव चिंचमलतपुरे,अभिषेक देशपांडे, निखिलेश राहिसे,रुशुभ गौरव, नयन पटेल, रोहन जोशी उपस्थित होते.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!