काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोसंबी करिता बाजारपेठ उपलब्ध करून देणार-चरणसिंग ठाकूर.

काटोल – विधानसभा क्षेत्रातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी बांधवांना आपले मोसंबी विकण्याकरिता नागपूरला न्यावी लागत असून त्यांची लुटमार होते. शेतकरी बांधवांची लुटमार थांबण्याकरिता काटोल मधील व्यापारी तसेच नागपूर येथील व्यापाऱ्यांना काटोल मध्ये प्राचारण करून मोसंबी खरेदी विक्री कृ.उ.बा.काटोल मध्ये सुरू करणार असल्याचे प्रतिपादन कृ.उ.बा. समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी केले ते कृ.उ.बा. समिती काटोलच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट 2022 ला बैल पोळा निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. पुढे ते म्हणाले की, गोंधन कमी होत असून ते वाढविण्याकरिता प्रोत्साहित करून गोधनाची संख्या वाढवण्याकरिता अनेक उपक्रम कृ.उ.बा. कडून राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त शेतकऱ्यांचा मालमत्ता खरेदी विक्री करिता नसून शेतकरी हितासाठी आहे. त्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा संकल्प आम्हा सर्वांचा आहे. आयोजित बैलपोळ्यामध्ये एकूण शहरातील विविध भागातील एकूण 44 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून चरणसिंग ठाकूर तर प्रमुख अतिथी उपसभापती गंगाधर झळके, संचालक दिनेश ठाकरे, हेमंतराव जीचकार, किशोर गाढवे, यादव तातोडे, दिगंबर धवड, उपस्थित होते.

बैलपोळ्यात सहभागी बरजोड्यांची सजावटीनुसार परीक्षक गणेशजी काळे, गजानन भोयर, गोपाळराव डांगोरे, अशोकराव काळे, युवराजजी राऊत, भाऊरावजी घारड, दामूजी वाळके, श्रीरामजी सत्यकार, महादेवराव रेवतकर, लक्ष्मणराव मेहर, या समितीनी निरीक्षण केले.

सजावटी करिता प्रथम बक्षीस रु. ११ हजार, पुरुषोत्तम राऊत या शेतकऱ्याच्या बैलजोडींन प्रथम क्रमांक, दुसरे बक्षीस रु. ५ हजार प्रत्येकी नितीन बागडे, गोपाल सोनवणे, बबनराव रेवतकर, चंदू जोगेकर, सुनील सातपुते यांच्या बैल जोडीने तर तृतीय बक्षीस प्रत्येकी रु.२१०० प्रत्येक रवींद्र भस्मे, संजय काळबांडे, ओमप्रकाश भस्मे, चंदू जोगेकर, गजानन शेरकर, रामदास भस्मे, दिलीप अडवाणी, सौरभ चन्ने, दीपक भस्मे, नितीन हजारे व सहभागी प्रत्येक बैलजोडीस रु. ११०० प्रमाणे बक्षीस देण्यात आले. सर्व बक्षीस पात्र बैलजोडीकरिता त्यांच्या मालकांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमात शहरातील तसेच परिसरातील असंख्य नागरिक तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी करिता सचिव पराग दाते यांचे मार्गदर्शनात सर्व कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

छत्तीसगढ़ी मनप्रीत ने जीता Mrs World 2022 का ख़िताब.

Sat Aug 27 , 2022
नागपुर – ग्लेमर्स की दुनिया में देश की चर्चित समूह एनिग्मा इवेंट मैनेजमेंट ने पिछले दिनों थाईलैंड के पट्टाया शहर में अंतर्राष्ट्रीय स्तर पर BEAUTY CONTEST का आयोजन किया था. जिसमें दुर्ग छत्तीसगढ़ की बेटी मनप्रीत कौर ने प्रमुखता से न सिर्फ भाग लिया बल्कि अपनी अमिट छाप छोड़ते हुए मिसेज वर्ल्ड 2022 का खिताब भी जीती। आयोजक मंडल द्वारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com