नागपूर :-नागपूर विद्यापीठातून पेट (PET) परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी (Ph D) गाईड मिळत नसल्याने विद्यापीठाने गाईड उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीसाठी 27 डिसेंबरला पेट-नेट परीक्षा पास झालेल्या व पेट-नेट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधी मंडळावर मोर्चा काढण्याची तयारी केलेली आहे.
हा शिक्षित व पीएच डी धारकांचा मोर्चा मंगळवार दि 27 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता यशवंत स्टेडियम येथून निघेल. मोर्चा व्हेरायटी चौक मार्गे, शहीद गोवारी टी पॉईंट येथे पोहोचेल.
उच्च शिक्षितांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी व प्रस्थापित शासनाचे चुकीचे शैक्षणिक धोरण निदर्शनास आणून देण्यासाठी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष व माजी माहिती संचालक भिक्खू महेंद्र कौसल व सचिव उत्तम शेवडे (9421800219, 937310294) यांनी केले आहे.