मार्च अखेरपर्यंत 100 टक्के कर वसुली झाली पाहिजे …! – प्रशासक श्याम मदनूरकर

– संदीप कांबळे, कामठी

स्लग-कर निरीक्षक, खाते प्रमुखांना प्रशासक एसडीओ श्याम मदनूरकर यांचे अल्टोमेंटम 

स्लग-सावधान मालमत्ता कर थकबाकीदारावर कामठी नगर परिषद उगारणार कारवाहीचा बडगा

कामठी :- पंचवार्षिक कार्यकाळ संपलेल्या कामठी नगर परिषद च्या कारभारात प्रशासक राज आले असून 12 फेब्रुवारी पासून प्रशासक म्हणून एसडीओ श्याम मदनूरकर यांनी पदभार स्वीकारला असता नगर परिषद कार्यालयातील सर्व खाते प्रमुख ,कर निरीक्षक आदींशी झालेल्या चर्चेतून मालमत्ता कराची वसुली ही समाधानकारक नसल्याने कर वसुली वर भर देण्याचे सांगितले मात्र कर वसुलीत पाहिजे तसा भर न दिसल्याने आता मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के कर वसुली झाली पाहिजे असे फर्मान एसडीओ श्याम मदनूरकर यांनी दिले आहे.
कामठी नगर परिषद च्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोतांपैकी मालमत्ता , पाणीपट्टीचो कर वसुली एक प्रमुख स्रोत आहे परंतु मागील अनेक वर्षात नगर परिषदेने शंभर टक्के कर वसुली केली नसल्याचे वास्तव आहे.करवसुलीच्या बाबतीत नगर परिषद च्या कर वसुली चा ग्राफ हा पन्नास टक्क्यांच्या आत आहे.मागील दोन वर्षांपासून कोरोनाकाळ च्या नावाखाली कर वसुली कमी प्रमाणात होती मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या नंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाही वसुलीचे आकडे जशास तसे आहेत.मालमत्ता विभागाकडे कर वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी आहेत.शिवाय कार्यालयीन कर्मचारी वेगळे आहेत.असे असतानाही कर वसुली हा नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे.
कर वसुली चा विचार केला असता कामठी नगर परिषद अंतर्गत जवळपास 17 हजार मालमत्ताधारक असून काही व्यापारी वर्ग मालमताधारक आहेत.या मालमत्ता धारकाकडून मागील वर्षी 2021 -22या आर्थिक वर्षात एकूण 1 कोटी 88 लक्ष रुपयाची मागणी होती त्यातून 70 लक्ष 78 हजार रुपयांची वसुली झाली असून 38 लक्ष 20 हजार रुपयांची वसुली थकबाकी होती तर चालू वर्षी 1 कोटी 14 लक्ष रुपये कर वसुली अपेक्षित होती मात्र फक्त 32 लक्ष 57 हजार रुपये वसुली झाली असून 73 लक्ष 18 हजार रुपयाची थकबाकी आहे यावर्षी ची कर वसुली ची टक्केवारी ही फक्त 30 टक्क्यांच्या आत आहे तसेच यावर प्रशासक श्याम मदनूरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कर विभागाची वसुली कमी का?असा थेट प्रश्न त्यांनी केला असून कर वसुली साठी कर निरीक्षकांनी पुढाकार घ्यावा आणि मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत शंभर टक्के करवसुली आणावी त्यासाठी थकबाकी दाराची यादी तयार करून त्यांचा पाठपुरावा करून कर वसुली करा अशा स्पष्ट सूचना दिल्या.

बॉक्स-कर निरीक्षक आबासाहेब मुंडे—यासंदर्भात प्रतिनिधी ने विचारले असता त्यांनी सांगितले की कर वसुली कमी आहे ते नाकारता येत नाही मात्र आता करवसुली वर भर दिला असून तसे पथक सुद्धा नेमले आहेत यानुसार नुकतेच एका नामांकित बँक कार्यालयावर असलेल्या कर वसुली साठी पथक गेले असता त्यांनी 24 तासाच्या आत 5 लक्ष 30 हजार रुपयांचा थकीत कराचा भरणा केला आहे.तसेच थकबाकीदारांना आता थकबाकी वर 2 टक्के व्याज लावण्यात आले असून 1मार्च पासून नगर परिषद च्या वतीने नागरिकांना आवश्यक त्या दाखल्यासाठी कराचा भरणा करणे आवश्यक आहे.कराची थकबाकी असल्यास आवश्यक त्या दाखल्यापासून वंचित राहावे लागणार हे इथं विशेष! तेव्हा मालमत्ता धारकानो थकीत कराचा भरणा करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान आबासाहेब मुंडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाची कारवाही

Tue Feb 22 , 2022
– संदीप कांबळे, कामठी कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येनाऱ्या गुमथळा गावाजवळ मौदा हुन नागपूर कडे विना परवाना विना रॉयल्टी अवैधरित्या ट्रक क्र एम 40 बी एल 7863 ने 4 ब्रास वाळू वाहून नेत असता गस्ती वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने वेळीच सदर ट्रक वर धाड घालण्यात यश गाठत आरोपी ट्रक चालक इम्रान बघेल ला ताब्यात घेऊन पुढील कारवाहिस्त्व सदर ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!