जोगेंद्रनाथ मंडल जयंती साजरी

नागपूर :- डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल मधून संविधान सभेत निवडून पाठवण्याचे महान कार्य करणारे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांची 119 वी जयंती आज दक्षिण नागपुरातील मान्यवर कांशीरामजी सार्वजनिक वाचनालयात बसपा नेते उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करुन साजरी करण्यात आली.

जोगेंद्रनाथ मंडल यांच्या विषयी बोलताना उत्तम शेवडे यांनी सांगितले की जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पुढाकारानेच बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ शकले. अन्यथा काँग्रेसच्या गांधी व नेहरूंनी बाबासाहेबांना संविधान सभेत जाण्यापासून जाणीवपूर्वक रोखले होते. परंतु जोगेंद्रनाथ मंडल व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने बाबासाहेब संविधान सभेत पोहोचल्याचा बदला म्हणून त्यांचा मतदारसंघच पाकिस्तानच्या स्वाधीन केला होता. परिणामतः बाबासाहेबांचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांना मुंबईतून प्रतिनिधित्व करावे लागले होते हे विशेष.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढेंगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ सोनटक्के यांनी तर समारोप विनोद सहाकाटे यांनी केला.

कार्यक्रमाला प्रा जगदीश गेडाम, चंद्रकांत कांबळे, श्यामराव तिरपुडे , संभाजी लोखंडे, कुणाल शेवडे, प्रथमेश डवले, रेहान खान, आदर्श शेवडे, आर्शी घोडेस्वार, आफिया मोहम्मद, आयरा मोहम्मद, अणेशा घोडेस्वार, रुई शहारे, आस्था शेवडे आदी प्रामुख्याने उपस्थित हो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com