शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करा ; रश्मी बर्वे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

– अन्यथा ;तहसील कार्यालय बंद पाडण्याची चेतावणी रश्मी बर्वे 

कन्हान :- अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे शेतपिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संदर्भाचे निवेदन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस पक्षाद्वारे तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढून पारशिवणी तहसीलदार यांना देण्यात आले, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाने पंचनामे करावे अन्यथा तहसील कार्यालय बंद पाडण्याची चेतावणी बर्वे यांनी दिलेली आहे.

पारशिवणी तालुक्यातील धान,तूर,पराटी आणि चना उत्पादक शेतकरी हवालदिल होण्याच्या मार्गावर आहे,डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.मात्र प्रशासना कडून अद्यापही शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरू झाले नसल्याने बुधवारला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटी द्वारा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता प्रसंगी मोठ्या प्रमानात शेतकरी वर्ग उपस्थित होत यावेळी राज्य शासना विरोधात निदर्शने देत मोर्चा तहसील कार्यलयावर धडकला तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी सोबत आणलेले धान पीक दाखवून शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती शेतकऱ्यांनी दाखविली यावेळी रश्मी बर्वे यांनी नुकसान ग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे सुरू न झाल्यास तहसील कार्यालय बंद पाडण्याची चेतावणी यावेळी बर्वे यांचे सह संतप्त शेतकरी आणि तालुका काँग्रेस पक्षाच्या वतिने देण्यात आली.प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे,शिक्षण सभापती राजू कुसुंबे,पंचायत समिती सभापती मंगला निंबोने, उपसभपती करुणा भोवते,मीना कावळे, रामभाऊ ठाकरे,श्यामकुमार बर्वे,मीना येवले,श्रीधर झाडे, अशोक चिखले,दीपक भोयर,बळवंत पडोळे,गणेश सरोदे, मारोती हूड,सतीश घारड,कमलाकर राऊत,प्रवीण चव्हाण, सुभाष तडस, राजू महाजन,मनोज घारड,गोपाल दुरडे, पवन राऊत,अरविंद धोटे, इंद्रपाल गोरले,गोविंदा ठाकरे, प्रविण धोटे, पांडुरंग मालगोद,गुरुचींद मेटकुळे, रामसजात नाकाडे सागर येरणे सह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ’महामानवा’ला अभिवादन

Thu Dec 7 , 2023
– भदंत सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना – भीम स्मृतीचे सामूहिक वाचन नागपूर :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com