राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात पार…

मुंबई : – राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पार पडली.

या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या बैठकी महिलांना संबोधित करताना देशभरात आणि राज्यभरात अनेक घटना घडत असल्याने लोकांचा आज उद्रेक होत आहे. या गोष्टीबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हाती घेतलेला जन जागरण यात्रा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

नुसते हायवे झाले म्हणजे विकास झाला असे या सरकारला वाटते. महागाई, रोजगार हा विषय सरकारला महत्त्वाचा वाटत नाही. यासाठी सर्व भगिनींनी पुढे यायला हवे. या सरकार विरोधात आवाज उठायला हवा. जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात हा उपक्रम यशस्वी करायला हवा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

प्रसारमाध्यमे आपली भूमिका लावून धरतील अशी अपेक्षा ठेवू नका मात्र समाजमाध्यमावर आपल्या या उपक्रमाची जोरदार प्रसिद्धी करा. हे सरकार कशाप्रकारे सत्तेत आले आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा प्रचार करून लोकांसमोर यांची फसवेगिरी उघडी पाडावी, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

आदरणीय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष आम्ही रक्ताचं पाणी करून इथपर्यंत आणला आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. एखादी महिला पक्ष सोडत असेल तर त्यांची विचारपूस करा, त्यांचे मत बदला, प्रत्येकाचा मान राखा, असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

आपला पक्ष हा सर्वात जास्त चर्चेत असलेला पक्ष आहे. भाजपला खात्री आहे हा पक्ष राज्यात काहीही करू शकतो. त्यामुळे आपल्यावर प्रहार केला जात आहे. येत्या काळात आपल्यावर अनेक अधिक प्रहार होतील, आपण मात्र घाबरून जायचं नाही. लढा देणे, संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे. २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा इतिहास घडवेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिलाध्यक्षा खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्षा राखी जाधव, राज्य महिला निरीक्षक आशा मिरगे, आशा भिसे, राज्य महिला समन्वयक सुरेखा ठाकरे, विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, वैशाली मोटे, कविता म्हेत्रे, शाजिया शेख, वर्षा निकम, शाहीम हकीम, अर्चना घारे आदींसह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्व तपस्वी स्थानांमध्ये विंध्य पर्वत हे श्रेष्ठ स्थान आहे : बालयोगी संजय महाराज

Wed Nov 16 , 2022
श्री राम कथा मानस आणि श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचे चार घाट सुरू आहेत अखिल विश्व सरयूपारीण ब्राह्मण महासभा आयोजित केली नागपूर : विंध्य पर्वताचा महिमा वर्णन करता येणार नाही. सर्व तपस्वी स्थळांमध्ये विंध्य पर्वताचे स्थान श्रेष्ठ आहे. असे उद्गार विंध्यपीठाधीश्‍वर तुलसी मानस मर्मज्ञ, , बालयोगी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत संजय महाराज यांनी आपल्या अमृतमय भाषणात व्यक्त केले. अखिल विश्व सरयूपारीण ब्राह्मण महासभा, नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com