संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28:- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून उपसरपंच पदाची निवडणूक ही 6 जानेवारी 2023 ला होणार आहे. 20 डिसेंबर ला मतमोजणी अंती घोषीत निकालानुसार 27 सरपंच व 247 सदस्य विजयी झाले त्यात 27 ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवडुन आलेल्या 27 सरपंचमधून 14 महिला सरपंच निवडून आल्या आहेत त्यामुळे 27 पैकी 14 ग्रा प मध्ये महिला राज दिसून येत आहे.
या 14 ग्रा प च्या महिला राज मध्ये लिहिगाव ग्रा प च्या सरपंच अस्मिता निलेश खांडेकर, तरोडी बु ग्रा प सरपंच आरती प्रवीण चिकटे, कापसी बु ग्रा प सरपंच तुळसा भगवान शेंदरे, शिवणी ग्रा प सरपंच माधुरी भगवान कोरडे, जाखेगाव ग्रा प सरपंच भारती सचिन भोयर, गुमथळा ग्रा प सरपंच प्रणाली योगेश डाफ,सोनेगाव ग्रा प सरपंच मंदा विजय शिंदें मेश्राम, येरखेडा ग्रा प सरपंच सरिता मधुकर रंगारी, भिलगाव ग्रा प सरपंच भावना चंद्रकांत फलके, खसाळा ग्रा प सरपंच जयश्री धनंजय इंगोले, खैरी ग्रा प सरपंच योगिता किशोर धांडे,सुरादेवी ग्रा प सरपंच मालाबाई बाबुराव घोडगे,गुमथी ग्रा प सरपंच सीमा अविनाश मोरे,खापा ग्रा प सरपंच आशा मदन राजूरकर चा समावेश आहे.
@ फाईल फोटो