27 पैकी 14 ग्रामपंचायत मध्ये महिलाराज

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28:- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून उपसरपंच पदाची निवडणूक ही 6 जानेवारी 2023 ला होणार आहे. 20 डिसेंबर ला मतमोजणी अंती घोषीत निकालानुसार 27 सरपंच व 247 सदस्य विजयी झाले त्यात 27 ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवडुन आलेल्या 27 सरपंचमधून 14 महिला सरपंच निवडून आल्या आहेत त्यामुळे 27 पैकी 14 ग्रा प मध्ये महिला राज दिसून येत आहे.

या 14 ग्रा प च्या महिला राज मध्ये लिहिगाव ग्रा प च्या सरपंच अस्मिता निलेश खांडेकर, तरोडी बु ग्रा प सरपंच आरती प्रवीण चिकटे, कापसी बु ग्रा प सरपंच तुळसा भगवान शेंदरे, शिवणी ग्रा प सरपंच माधुरी भगवान कोरडे, जाखेगाव ग्रा प सरपंच भारती सचिन भोयर, गुमथळा ग्रा प सरपंच प्रणाली योगेश डाफ,सोनेगाव ग्रा प सरपंच मंदा विजय शिंदें मेश्राम, येरखेडा ग्रा प सरपंच सरिता मधुकर रंगारी, भिलगाव ग्रा प सरपंच भावना चंद्रकांत फलके, खसाळा ग्रा प सरपंच जयश्री धनंजय इंगोले, खैरी ग्रा प सरपंच योगिता किशोर धांडे,सुरादेवी ग्रा प सरपंच मालाबाई बाबुराव घोडगे,गुमथी ग्रा प सरपंच सीमा अविनाश मोरे,खापा ग्रा प सरपंच आशा मदन राजूरकर चा समावेश आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंदुस्तान लिव्हर ची जागा शहराकरिता घेण्या संदर्भात मुख्यमंत्री यांचे कडे बैठकीची मागणी

Wed Dec 28 , 2022
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी सर्वपक्षीय नागरिक कृती समिती, व्यापारी संघटनेचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हयांना निवेदन.  कन्हान (नागपुर) : – शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने शहराच्या विकास कार्य आणि मुलभुत सुविधावर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हयांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ हिंदुस्तान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights