नागपूर :- आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी महानगरपालिका कडे रू. ९०० कोटी रक्कम येणे आहे. नागपूर शहरातील एकुण ६.६८ लक्ष मालमत्ता धारकांपैकी फक्त २.६० लक्ष मालमत्ता धारकांनी १३३ कोटी मालमत्ता कर म.न.पा निधीत जमा करून माहे जून पर्यंत १०% सवलतीचा लाभ घेतलेला आहे. उर्वरित ४.०८ लक्ष मालमत्ता धारकांनी चालू वित्त वर्षाचा मालमत्ता कर दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नागपूर महानगरपालिका निधीत Online सुविधेचा वापर करून जमा करणाऱ्या मालमत्ताधारकांस मालमत्ता कर रक्कमेत १०% सवलत व मालमत्ता कर वसुली केंद्रावर प्रत्यक्ष हजर होवून Offline सुविधेद्वारा जमा करणाऱ्या मालमत्ताधारकांस मालमत्ता कर रक्कमेत ५% सवलत (शासनाचा कर वगळून) देण्यात येईल.
आजपावेतो Online पध्दतीने १ लक्ष पेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी ६० कोटी मालमत्ता कर म.न.पा निधीत जमा करून ५.४० कोटी रू. सवलत प्राप्त करून घेतलेली आहे.
तसेच आजपावेतो Offline पध्दतीने १.६० लक्ष पेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी ६८ कोटी मालमत्ता कर म.न.पा निधीत जमा करून २.५६ कोटी रू. सवलत प्राप्त करून घेतलेली आहे.
दि. १ जानेवारी २०२५ पासुन थकित मालमत्ता करावर मासिक २% दराने शास्ती आकारण्यात येईल, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे तरतुदी नुसार मालमत्ता धारकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
दि. ३१ डिसेंबर पुर्वी मालमत्ता कर जमा करून कार्यवाही टाळावी. असे आव्हान मालमत्ता कर विभाग, महानगरपालिका यांनी केले आहे.