– महात्मा फुले समाज क्रांतीचे जनक: गजघाटे
– दीक्षाभूमीवर महात्मा फुले जयंती साजरी.
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थान मानले. कारण महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले समाज क्रांतीचे जनक होते. असे उद्गगार दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी काढले. दीक्षाभूमीवर महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार नाटककार प्रभाकर दुपारे होते. यावेळी लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संचालक भैय्याजी खैरकर सामाजिक कार्यकर्ते पवनभाऊ शेलारे, जितेंद्र म्हैसकर, आस्तिक बागडे, शरद मेश्राम, मधुकर मेश्राम, देवाजी रंगारी, सतीश रामटेके, मिलिंद थुल, कैलासराव, नरेंद्र खैरकर, ज्ञानेश्वरराव ठाकरे, सुरज गणेर, भंते सुगत बोधी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रभाकर दुपारे म्हणाले की, समाजातील अनेक कुप्रथानां नष्ट करण्याचे महान कार्य ज्योतिबा फुले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा यावेळी भैय्याजी खैरकर यांनी घेतला. शेवटी शरद मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले