संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 11 :- कामठी तालुक्यातील आजनी येथे सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
संचालक लिलाधर दवंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या बद्दल माहिती सांगितली.
या प्रसंगी राहुल ढोक, प्रतिक्षा दवंडे, जयेश घोडे, गौरव लायबर, पूजा दवंडे, प्रियंका घोडे, कार्तिक दवंडे, मोहित वाट, अंकित जेवडे, अंजली दवंडे, सृष्टी दवंडे, राजकुमार दवंडे, श्रावणी मासोतकर या विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.