मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राची पदकांची लयलूट

– पाच सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदके

– डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे तिहेरी सुवर्णयश

पणजी :- मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूनी पदकांची लयलूट करताना पाच सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदके मिळवली. डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे तिहेरी सुवर्णयश हे वैशिष्ट्य ठरले.

डॉली पाटीलने महिला ट्रायथलेमध्ये २१ मिनिटे ०८.८३ सेकंदाची वेळ देत सोनेरी यश मिळवले. याच गटात मुग्धा वव्हाळ (२१ मिनिटे ०७.६०) कांस्य पदकाची मानकरी ठरली. मग डॉलीने मिश्र रिले प्रकारात मयांक चाफेकरच्या साथीने २० मिनिटे ४१.४३ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर डॉलीने मुग्धा आणि श्रुती गोडसेच्या साथीने महिला सांघिक गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.

मयांकने १८ मिनिटे १४.१७ सेकंद वेळेसह सुवर्ण पदक पटकावले, तर पार्थ मिरागेला रौप्य पदक मिळाले. तसेच मयांक, पार्थ आणि अंगड इंगळेकर या त्रिकूटाने पुरूषांचे सांघिक जेतेपद मिळवले.

लेझर रन महिला गटात योगिनी साळुंखेला रौप्य पदक मिळाले. योगिनीने मुग्धा आणि ज्योत्स्ना यांच्या साथीने सांघिक गटात रौप्य पदक संपादन केले. मिश्र गटात योगिनी आणि शहाजी सरगर जोडीने कांस्य पदक मिळवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संशोधनाला व्यावहारिकतेची जोड आवश्यक - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Oct 28 , 2023
– आयुर्वेद महाविद्यालयातील चर्चासत्राचे उद्घाटन नागपूर :- अशक्य वाटणारी गोष्टही संशोधनातून शक्य आहे. पण या संशोधनाला व्यावहारिकतेची आणि वास्तविकतेची जोड दिली तर त्याची लोकप्रियता वाढविणे अधिक सहज होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (आज) केले. हनुमान नगर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!