शाश्वत विकास उद्दिष्टांच्या राष्ट्रीय स्तरावरील पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नवी दिल्ली :- शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे ठरत आहे, असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत ते बोलत होते.

नवी दिल्ली येथे दिनांक २३ व २४ सप्टेंबर, २०२४ रोजी लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद “शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका” या विषयावर आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित आहेत.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभेचे उप सभापती हरिवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला. परिषदेतील चर्चासत्रात ॲड. राहुल नार्वेकर यांनी आपले विचार मांडले.

पर्यावरण रक्षणासाठी सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन, समृध्दी महामार्गालगत बांबू लागवड यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरणाचा वेग असलेले राज्य असल्याने सार्वजनिक वाहतुकीचे विस्तारते जाळे, इलेक्ट्रिक वाहने, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प या मुद्यांकडे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे लक्ष वेधले. विधानमंडळ म्हणून विचार करता केवळ आर्थिक विकास हेच एकमेव मानक स्वीकारून चालणार नाही तर सर्वसमावेशक विकास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना पायाभूत सोयीसुविधांचा वापर शहरांबरोबरच ग्रामीण विभागात वाढत्या रोजगार संधी निर्माण करणे या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे ॲड नार्वेकर यावेळी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवे सांस्कृतिक धोरण राज्याला देशात अव्वल बनविणारे - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Tue Sep 24 , 2024
– महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर – सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या कार्याध्यक्षतेखालील समितीने केल्या होत्या सर्वंकष शिफारशी मुंबई :- नवे सांस्कृतिक धोरण हे सर्वंकष व व्यापक असून महाराष्ट्राला देशात अव्वल बनवेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्याच्या सांस्कृतिक धोरण-2024 ला कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या नवीन सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com