10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024’

– अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर  

नागपूर :- प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे.

शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता 10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-1 घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होणार आहे.

इ. 1 ली ते 5वी आणि इ. 6वी ते 8वी करिता सर्व व्यवस्थापने, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित ईत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: MAHATET परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परिक्षेकरिता 9 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तर 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-4 यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज, तसेच परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती, परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची असल्याचा अभिमान - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Wed Sep 11 , 2024
– चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवाना चंद्रपूर :- अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com