संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज दिनांक 1 में 2023 महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार 2022-23 (युवती ) पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते आणि नागपूर जिल्हाधिकारी विपीन इटनकर ,पोलिस कमिशनर अमितेशकुमार, NMC कमिशनर राधाकृष्णन बी,जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर जिल्ह्याच्या युवक कल्याण विषयक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचा मानात सहभाग नोंदविल्याबद्दल आज हा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे श्रेय एकट्याचे नसून सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या त्या सर्वांचे आहे. तसेच गेल्या 4 वर्षात सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक कार्याची जाण आणणाऱ्या नेहरू युवा केंद्राचे देखील तेवढेच महत्व आहे. यामध्ये प्रामुख्याने दिनेश ढोले (जि.प.सदस्य), प्रत्येक कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या प्रांजल वाघ (माजी सरपंच कढोली),अतुल बाळबुधे (सरपंच केम), आरती शहाणे (सरपंच गारला-सावळी), उज्वला पाटील (माजी सरपंच पळसाड), विलास भोयर(सरपंच निंबा-चिखली), राहुल बोढारे (उपसरपंच गारला),राहुल मोहोड (माजी उपसरपंच आवंढी), या सर्वांचे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य वेळोवेळी प्राप्त झाले. शेवटी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार.