लोकसभा निवडणुकांच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान आता पूर्ण

– सातव्या टप्प्यात रात्रौ 8:45 पर्यंत 59.45% मतदान

नवी दिल्ली :- 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज 7 व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या सातव्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. या टप्प्यात रात्री 8:45 पर्यंत अंदाजे 59.45% मतदान झाले.

ओदिशात लोकसभा मतदारसंघांसह 42 विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी मतदान झाले. सातव्या टप्प्यातील मतदानाच्या समाप्तीसह सार्वत्रिक निवडणुका 2024 साठीचे मतदान आता पूर्ण झाले आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचे मतदान देखील पूर्ण झाले आहे.

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका तसेच आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या विधानसभेच्या मतांची मोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतमोजणी 2 जून 2024 रोजी होईल.

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे मतदार, मतदान कर्मचारी, कायदा अंमलबजावणी संस्था, सुरक्षा दले आणि निमलष्करी दल, स्वयंसेवक, भारतीय रेल्वे आणि हवाई दल यासह सर्व भागधारकांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सातव्या टप्प्यात रात्री 8:45 पर्यंत अंदाजे 59.45% मतदान झाले असून मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट ॲपवर राज्य, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ निहाय अपडेट केली जाईल. ही आकडेवारी राज्य, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ अशा आकड्यांव्यतिरिक्त प्रत्येक टप्प्यानुसार देखील देण्यात देईल. याशिवाय हितधारकांच्या सोयीसाठी आयोग रात्री 23:45 वाजता मतदानाच्या आकडेवारीसह दुसरे प्रसिद्धी पत्रक जारी करेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंचपरिवर्तनयुक्त भारत के उद्भव की आवश्यकता - श्रीधरराव गाडगे

Mon Jun 3 , 2024
– चिखली में विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्गका समापन चिखली :- कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था निर्मिती एवम् नागरिक शिष्टाचार और कर्तव्य पालन द्वारा हम सभी को पंचपरिवर्तनयुक्त भारत का उद्भव करना आवश्यक है ऐसा प्रतिपादन प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे इन्होंने किया। चिखली में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के विदर्भ प्रांत ‘संघ शिक्षा वर्ग (सामान्य)’ के समापन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com