महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागामार्फत बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक

मुंबई :- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाच्या 27.७४ कोटीच्या कर महसूलाची हानी करणा-या व्यक्तींना अटक केली असल्याचे अन्वेषण विभागाचे राज्यकर सहआयुक्त, यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मे. श्री समस्ता ट्रेडिंग प्रा.लि. व शरद क्लिअरींग अँड फॉरवरडिंग प्रा. लि. या व्यापा-यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. अनेक बनावट कंपन्यांची स्थापना करून बोगस बिल देण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात वस्तु व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात धडक मोहीम राबवून त्याअंतर्गत प्रमुख सूत्रधार राहुल अरविंद व्यास व विकी अशोक कंसारा यांना ४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून महानगर दंडाधिकाऱ्यांनी सदर व्यापाऱ्यांस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. बोगस व्यापार करुन करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे बाजारपेठेतील स्पर्धा नष्ट होऊन सुयोग्य धंदा करु इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र या अटक कारवाईतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे गंभीर इशारा दिलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Charkha Laboratory at The Chanda Devi Saraf High School and Junior College

Mon Oct 9 , 2023
Nagpur :- The Pandemic played havoc with the psyche of the children when they were at home for months. Post unlock, they were indisciplined in behavior and academically behind by a couple of years. The Educators struggled to bring them all back to focus and concentrate. One of the many initiatives by Nisha Saraf, Director of The Chanda Devi Saraf […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com