विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या पसंतीचे राज्य – फडणवीस

नागपूर :- महाराष्ट्र विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये पहिल्या पसंतीचे राष्ट्र ठरले आहे. राज्यात गुंतवणूक वाढत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिल्या तीन महिन्यात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याचे अहवालात पुढे आले असल्याचे सांगितले.

राज्यात सत्ता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला थेट विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर ठेवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्याचे प्रत्यंतर नव्या अहवालात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.

डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे. गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१ सप्टेंबरपासून गणेश मंडळांच्या सोयीसाठी एक खिडकी व्यवस्था करा

Tue Aug 29 , 2023
– मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे निर्देश – पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध विभागांची मनपात बैठक नागपूर :-  केन्द्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार यावर्षी पी. ओ. पी. मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. येत्या गणेशोत्सवासाठी सर्व मूर्तिकार, कलावंतानी पर्यावरणपूरक मूर्तीची निर्मिती करण्याकरिता मनपाच्या झोन कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घेणे आवश्यक असून गणेश मंडळांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकाद्वारा १ सप्टेंबरपासून एक खिडकी व्यवस्था करण्यात यावी, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com