राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कल हाती येऊ लागले आहे. या कलामध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. भाजपने टपाली मतमोजणीत आघाडी घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. सकाळी ८.४५ पर्यंत मिळालेल्या कलानुसार भाजपने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीमधील शिवसेना २४ आणि राष्ट्रवादीला १८ जागा मिळताना दिसत आहे. महायुतीने २३३ जागांपैकी १२२ जागांवर आघाडी घेतली आहे.
महाविकास आघाडीची राज्यात पिछाडी होत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर ठाकरे गट तर ३१ जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच चुरस दिसत आहे. राज्यातील निकालाचे चित्र दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
बारामतीमध्ये पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर होते. परंतु आता त्यांनी आघाडी घेतली आहे. येवलामध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून आघाडी घेतली आहे.