महाकाली भक्तांच्या पवित्र स्नानासाठी मनपाने केली झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता

चंद्रपूर : शहरातील माता देवी महाकालीच्या मंदिरात मार्गशीष महिन्यानिमित्त मराठवाडा, आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून भाविकांची गर्दी होत आहे. भाविक भक्तांना नदीच्या पात्रात पवित्र स्नान करता यावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली.

चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भक्तगण चंद्रपूर शहरात वर्षभर येत असतात. सध्या मार्गशीष महिन्यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. येथे येणारे भाविक दर्शनापूर्वी झरपट नदीत पवित्र स्नान करतात. येथे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने झरपट बंधाऱ्यावर पडलेला साबण, कागद, प्लास्टिक व इतर कचरा स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उचलला. श्री महाकाली मंदिर येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नदीच्या काठी व जलपात्रात कचरा आणि प्लास्टिक पिशव्या टाकू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विशेष लसीकरण मोहिमेद्वारे पूर्ण करणार लसीकरणाचे उद्दिष्ट

Thu Dec 23 , 2021
-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे निर्देश 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम लस न घेणाऱ्या नागरिकांना करणार फोनद्वारे समुपदेशन भंडारा, दि. 21 : लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट अद्यापही साध्य न झाल्याने विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील उर्वरीत लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात यावे व ज्या नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस प्रलंबित आहे. त्या नागरिकांना फोनद्वारे लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!