– डॉ. रविशंकर आंबी यांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे यशस्वी शोधप्रबंध
– 4 आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर पब्लिश केले
– 1 आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रकाशनासह 1 पेटेंट आपल्या नावी करण्याचा गौरव
नागपूर :-जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक देशात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात घडली. 40 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत हजारो नागरिकांसाठीच नव्हे तर प्रत्येक सजीवासाठी 2 आणि 3 डिसेंबरची रात्र ही काळरात्र ठरली. किटकनाशक बनवणाऱ्या एका कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली आणि पाहता पाहता अख्यं शहर गुदमरलं. जे वाचले ते एकतर अपंग झाले किंवा काही महिन्यांनी मरण पावले. भोपाळ गॅस ट्रॅडेजी नाव असलेल्या या रासायनिक दुर्घटनेमुळे आजही या ठिकाणी शारीरिक अपंगत्व किंवा दोष असलेली बालके जन्माला येतात. अश्या विषारी वायू गळती पुन्हा झाल्यास कमीत कमी वेळेत व कमीत कमी गॅस सेंन्स दाखवून होणारी दुर्घटना टाळण्याचे प्रभावी संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) डॉ. रविशंकर रमेश आंबी यांनी केले. ‘महाज्योती’ मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे.
डॉ. रविशंकर रमेश आंबी यांनी भौतिकशास्त्र या विषयातून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘स्टडीज ऑन मेटल ऑक्साईड एनआयओ कोटेड झेडएनओ थीन फिल्म्स फॉर गॅस सेंन्सिंग एप्लीकेशन’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केले. वायू गळती दुर्घटनेला प्रभावी मारक उपाय असलेल्या या प्रबंधात त्यांनी उपरोक्त विषयावर 4 आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर पब्लिश केले आणि 1 आंतराष्ट्रीय पुस्तक पब्लिश केले. याशिवाय 1 पेटेंट पब्लिश करून उल्लेखनिय कामगिरी त्यांनी केली आहे. इतिहासात नोंद असलेल्या अश्या घटनेला थांबिवण्यासाठी हे रिसर्च उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.
वायू गळतीला रोखण्यासाठी जगात अनेक वैज्ञानिक काम करीत आहेत. परंतु, आजवर प्रभावी रिसर्च झाले नाही. भोपाळ गॅस ट्रॅडेजी अश्या इतिहासात नोंद असलेल्या घटनेनंतर त्यावर योग्य उपाय काढण्याचे ध्येय बाळगत डॉ. आंबी यांनी 4 वर्ष यावर संशोधन करण्यास सुरूवात केली. पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी विद्यावेतनाकरिता महाज्योतीकडे अर्ज केला. महाज्योतीकडून दरमाह 35 हजार विद्यावेतन मिळाल्यानेच 4 वर्षात डॉ. आंबी यांनी आपला शोध प्रबंध यशस्वी पूर्ण केले. डॉ. आंबी यांनी महाज्योतीमुळे मिळालेल्या विद्यावेतनाबद्दल आभार मानले आहे. तसेच डॉ. आंबी यांना आईआईटी मुंबईकडून कॅरेक्ट्रायझेशनसाठी फंडीग मिळाले.
– वायू गळतीवर संशोधनातून दुर्घटनेला रोखण्यास उपयुक्त ठरणार : राजेश खवले
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज भोपाळ गॅस ट्रॅडेजी सारखी भीषण दुर्घटनेला प्रतिकार कसा करण्याचे मोठे संशोधन डॉ. रविशंकर आंबी यांनी केले आहे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांने केले हे संशोधन अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. महाज्योतीने आता ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये 37 हजार रूपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेणार, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले म्हणाले.
– मंत्री अतुल सावेंनी केले डॉ. आंबी यांचे कौतुक
महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी वायू गळतीवर प्रभावी संशोधन करणाऱ्या डॉ. रविशंकर आंबी यांचे कौतूक केले. भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला टाळण्यासाठी डॉ. आंबी यांचे प्रबंध जगासाठी हितकारक ठरणार अशी प्रतिक्रीया डॉ. सावे यांनी दिली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी डॉ. आंबी यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
संशोधनाचे नेमके स्वरूप
झिंक ऑक्साईड हे मटेरिअल वापरून केमिकल बाथ डिपॉझिशन या पद्धतीने थीन फिल्म तयार केले. यावर निकेल ऑक्साईड कोटिंग केलेल्या गॅस परफॉरमन्स पेक्षा कमी रिझल्ट दाखवले. यावरून 2 मटेरिअल वापरून जास्त गॅस परफॉरमन्स दाखवतो हे सिद्ध होते. तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गॅस डिटेकशन दाखवले हे देखील महत्वाचे आहे. तर कोटिंग केल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त गॅस डिटेक्शन दाखवतो.
कुठे याचा वापर होऊ शकतो
सदरच्या संशोधनाचा वापर हा मोठ-मोठ्या औद्योगिक कंपनी आणि घरामध्ये होवू शकतो. एखादया इंडस्ट्रीज मध्ये वायू गळती झाली असेल तर कमी वेळेत तो निदर्शनास येवू शकतो. जेणेकरून होणारी दुर्घटना टळू शकते. तसेच घरामध्ये देखील गॅस गळती होवून मोठी दुर्घटना टळण्यास यांचा वापर आपण करू शकतो.
दुर्घटना कशी टळू शकते
एखादया कंपनीमध्ये वायूगळती झाली असेल तर नॉर्मल माणसाला ते निदर्शनास येणार नाही किंवा निदर्शनास येऊ पर्यंत खूप वायू गळती झाली असेल. तर ते थांबवने देखील अशक्य होईल. अशा वेळेस कमीत कमी गॅस लिक झालेला तो सेंसर वायू गळती निर्दशनास आणून देईल किंवा त्याचा बजर वाजवून, तो सावधान करेल. जेणे करून ताबडतोब वायू गळती थांबविता येईल. तसेच यामुळे मोठी दुर्घटना टाळता येईल.