नागपुर :- आज दिनांक 17/03/2023 ला आम आदमी पार्टी, प्रभाग 8, उत्तर नागपूर द्वारे देशमुख ले-आऊट, नवी मंगळवारी या परिसरात तीन महिन्यापासून पानी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे झोनल अधिकारी, ओसीडब्लू कार्यालयावर स्थानीय नागरिकांसह मडका फोडो आंदोलन करण्यात आले. स्थानीय नागरिक व आम आदमी पार्टी कडून गेल्या तीन महिन्यात अनेक वेळा ocw झोनल अधिकारी, यांना वारंवार निवेदन देण्यात आले तरी त्या परिसरातील राहते नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्यामुळे समाधान झाले नाही. म्हणून आज झोनल अधिकारी ओसीडब्लू विभाग, जागनाथ बुधवारी या ठिकाणी किशन निमजे यांचा नेतृत्वात मटका फोडो आंदोलन करण्यात आले. या वेळी ocw झोनल अधिकारी नाईक यांनी दररोज दोन तास रोज पानी देऊ अशी खात्री करून दिली.यावेळी विजय नंदनवार, प्रदिप पौनिकर, नरेश महाजन, नानक धनवाणी, महेश गुप्ता, अनिल संभे, संदीप साखरे, सुरज धपोडकर, हरेश निमजे, नंदिनी निमजे, पंकज मेश्राम, शुभम मोरे, हरेश वेळेकर, चेतन निखारे, कांचन माणिकपुरे, द्वारकानाथ शाहू, बालाजी मोरथोड, घाटबांधे, रुखमीनी शाहू, नथुराम शाहू इत्यादी आंदोलनाला यशस्वी बनवण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आम आदमी पार्टी, उत्तर नागपूर कडून ocw विरोधात मडका फोडो आंदोलन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com