मध्य प्रदेशला महावितरणच्या कामाची भुरळ

नागपूर :- महावितरणतर्फ़े करण्यात येणा-या वीज पुरवठ्याच्या देखभाल आणि दुरुस्ती कामाच्या कार्यपद्धतीची भुरळ पडल्याने मध्य प्रदेश विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी नागपूर परिमंडलातील गांधीबाग विभाग आणि नागपूर परिमंडल कार्यालयांना भेट देत महावितरणतर्फ़े राबविण्यात येत असलेल्या देखभाल आणि दुरुस्ती कामाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली.

मध्य प्रदेश विद्युत वितरण कंपनीचे महाव्यवस्थापक आर. पी चौबे आणि शिशिर गुप्ता या दोन अधिका-यांनी नुकतीच महावितरणच्या नागपूर परिमंडलातील विविध कार्यालये, उपकेंद्रांन भेट दिली. त्यांच्या या दोन दिवसीय अभ्यास दौ-यात त्यांनी 33 केव्ही चिंतेश्वर उपकेंद्र, 33 केव्ही नागभवन उपकेंद्राला भेट दिली, सोबतच केबल जोडणि सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याशिवाय गांधीबाग विभाग, नागपूर शहर मंडल, परिमंडल आणि प्रादेश्किक संचालक कार्यालयांना भेट देत परिमंडलात सुरु असलेल्या एकूणच देखभाल आणि दुरुस्तीच्या कार्यपद्धतीची इत्यंभुत माहिती घेतली.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे व इतर संबंधित अधिका-यांनी मध्य प्रदेश विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-यांनी महावितरणमध्ये सुरु असलेल्या कामांची तपशिलवार माहीती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा क्षेत्रात ३६,९५३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट निर्धारीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Wed Feb 28 , 2024
चंद्रपूर :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात येत्या ३ मार्च रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मनपा क्षेत्रातील ३६,९५३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. या मोहीमेच्या नियोजनासाठी मनपा स्तरीय सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली २२ फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com