नागपूर :- महावितरणतर्फ़े करण्यात येणा-या वीज पुरवठ्याच्या देखभाल आणि दुरुस्ती कामाच्या कार्यपद्धतीची भुरळ पडल्याने मध्य प्रदेश विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी नागपूर परिमंडलातील गांधीबाग विभाग आणि नागपूर परिमंडल कार्यालयांना भेट देत महावितरणतर्फ़े राबविण्यात येत असलेल्या देखभाल आणि दुरुस्ती कामाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली.
मध्य प्रदेश विद्युत वितरण कंपनीचे महाव्यवस्थापक आर. पी चौबे आणि शिशिर गुप्ता या दोन अधिका-यांनी नुकतीच महावितरणच्या नागपूर परिमंडलातील विविध कार्यालये, उपकेंद्रांन भेट दिली. त्यांच्या या दोन दिवसीय अभ्यास दौ-यात त्यांनी 33 केव्ही चिंतेश्वर उपकेंद्र, 33 केव्ही नागभवन उपकेंद्राला भेट दिली, सोबतच केबल जोडणि सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याशिवाय गांधीबाग विभाग, नागपूर शहर मंडल, परिमंडल आणि प्रादेश्किक संचालक कार्यालयांना भेट देत परिमंडलात सुरु असलेल्या एकूणच देखभाल आणि दुरुस्तीच्या कार्यपद्धतीची इत्यंभुत माहिती घेतली.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे व इतर संबंधित अधिका-यांनी मध्य प्रदेश विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-यांनी महावितरणमध्ये सुरु असलेल्या कामांची तपशिलवार माहीती दिली.