युवकांना सक्षम करण्यासाठी भगवान बुद्धांची शिकवण – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्‍ली :- युवकांनी स्वतःला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि एक शांततामय समाज, राष्ट्र आणि जग उभारण्यासाठी भरीव योगदान देण्याकरिता भगवान बुद्धांची शिकवण अंगीकारावी असे आवाहन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

आषाढ पौर्णिमेला, धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिलेल्या ध्वनिमुद्रित संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की भगवान बुद्धांच्या शील, सदाचार आणि प्रज्ञा या तीन शिकवणींचे आचरण करून युवा पिढी स्वतःला अधिक समृद्ध करू शकते आणि समाजात सकारात्मक परिणाम घडवून आणू शकते.

“आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान बुद्धांच्या धम्माची ओळख झाली जो केवळ आपल्या प्राचीन वारशाचा एक भाग नव्हे तर आपल्या दैनंदिन आयष्याचा एक महत्वाचा घटक आहे,” बुद्ध धम्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम शाक्यमुनींनी सारनाथच्या पवित्र भूमीवर दिलेला पहिला उपदेश जाणून आणि समजून घेतला पाहिजे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (IBC) द्वारे आयोजित समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, या पवित्र दिवशी आपण बुद्धांची शिकवण आपल्या विचारांत आणि आचरणात आणणे महत्वाचे आहे.

सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, मीनाक्षी लेखी, यांनी त्यांच्या विशेष भाषणात एका सामान्य माणसाच्या बोधिसत्वाचा स्तर प्राप्त करण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत सांगितले. “ जरी आपण सर्व आपल्या मूल्यांनी जोडलेले असलो तरी आपण आपल्या स्वतःच्या कृतींसाठी जबाबदार आहोत, योग्य कृती आपले विधिलिखित बदलू शकते.

परमपूज्य 12 व्या चामगोन केंटिंग सितुपा यांनी आषाढ पौर्णिमेच्या महत्त्वावरील धम्म भाषणात सांगितले आहे की, “आम्ही बुद्धाच्या पहिल्या शिकवणीचा उत्सव साजरा करतो.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक

Tue Jul 4 , 2023
नवी दिल्‍ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री परिषदेची बैठक झाली. पंतप्रधानांनी ट्विट केले आहे : मंत्री परिषदेसमवेत एक फलदायी बैठक झाली, या बैठकीत आम्ही विविध धोरणांशी संबंधित मुद्द्यांवर विचार विनिमय केला. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com