‘लोकराज्य’ : शासन आणि जनतेला जोडणारा दुवा – उपसभापती नीलम गोऱ्हे

– विधानभवन परिसरातील लोकराज्य स्टॉलला भेट

नागपूर :- ‘लोकराज्य’‍ मासिक हे शासन आणि जनतेला जोडणारा महत्वाचा दुवा असून सर्वसामान्यांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.

विधानभवन परिसरातील ‍ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ अंकाच्या प्रदर्शनाला उपसभापती गोऱ्हे यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

अनेक मान्यवर व सामाजिक धुरिणांद्वारे विविध विषयांवर लोकराज्यमधून सातत्याने माहिती प्रसृत होत असते. त्यामुळे लोकराज्यचे अंक विधान परिषद सदस्य म्हणून मला महत्वाचे वाटत असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात प्रकाशित होत असलेले लोकराज्य मासिक https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गावागातील सरपंच, ग्रमापंचायत सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती मिळविण्यासाठी या संकेतस्थळावर लोकराज्यचे वाचन करण्याचे व सर्वसामान्य नारिकांना त्याबाबत अवगत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपसभापती गोऱ्हे यांचे लोकराज्यचा अंक भेट देवून स्वागत करण्यात आले. तर गोऱ्हे यांनी देखील ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ हे पुस्तक माहिती अधिकारी गजानन जाधव यांना भेट दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोट्यवधींची रोकड सापडलेल्या काँग्रेस खा.साहू यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर निदर्शने

Mon Dec 11 , 2023
मुंबई :- कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडलेल्या काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाने सोमवारी राज्यभरात आक्रमक होत आंदोलन केले. मुंबईत चर्चगेट येथे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ”मोहब्बत की दुकान” चा सेल्समन असलेल्या साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल असा सवाल वाघ यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!