राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य तान्हा पोळा थाटात संपन्न 

नरखेड :- स्थानिक मोवाड शहरात दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता आठवडी बाजार चौक मोवाड येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोवाड तर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन माजी गृहमंत्री अनिल देशमूख प्रणित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोवाड तर्फे आयोजन केले. यावेळेस एकूण 30 हजार रुपयाची बक्षीसाची खैरात बाल गोपालाना देण्यात आली तर प्रथम बक्षीस 3,100 रु, न.प.माजी नगराध्यक्ष अनिल साठोने यांच्या कडुन कुश दिलीप बनाईत यांना प्रथम बक्षीस देण्यात आले. दुतीय बक्षीस 2,551 रु, माजी सभापती मंगेश नासरे यांच्या कडुन चेतन पांडुरंग वाघे यांना तर तृतीय बक्षीस 2,151 रु, विजय बिलगये माजी उपाध्यक्ष यांच्या कडुन मानव रमेश जिचकार यांना देण्यात आले तर गुणानुक्रमाकाने पुढील बक्षीस देण्यात आली. 2,100 रु, रंजना सोळंके, 2,000 रु, विवेक लिखार, 1,851रु, अलीम शेख,1,800 रु, रमेश धकीते,1,700 रु, सोहेल शेख, 1,600 रु, दिलीप बनाईत, 1,500 रु, किशोर येवले, 1,351रु, झीब्राईल दिवाण, 1,251रु, स्वप्नील खसारे, 1,200 रु,रविंद्र भांदिर्गे, 1,151 रु, लक्ष्मीनारायण निमकर, 1,100 रु, प्रशांत दारोकर, 1,000 रु, बाबुराव कुंभारे, 901रु, रविंद्र कुंभारकर, 751 रु, विनय वैद्य, 551 रु, अशपाक सैय्यद, 501रु, समंद पटेल,असे एकूण 20 बक्षीसाची खैरात राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या कडून बालगोपालाना देण्यात आली तर काही आकर्षक नंदी सजावट, वेशभूषा, शेतकरी वेषा, अशा नंदी सजावटाना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आली. सहभागी बालगोपालाना भेट वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, मोवाड शहर व पदाधिकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, तसेच समस्त गावकरी मंडळी यांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.

NewsToday24x7

Next Post

गवळी समाज संघटना नागपूर तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Mon Sep 18 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर तर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाल येथे आयोजन करण्यात आले होते. दही हंडी भजन व्दारे सुरुवात झाली, भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी हिरामण गवळी अध्यक्षस्थानी होते. अशोक भाले, बाबासाहेब गलाट, निवृत्त विक्रीकर आयुक्त सोमनाथ नडंगे, निवृत्त अति.पो.महासंचालक टिकाराम भाल, […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com