लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ – नागपूर विभागात आज एक नामनिर्देशनपत्र दाखल

Ø विभागात आतापर्यंत ३८७ नामनिर्देशनपत्राची विक्री

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी आज नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. तर या पाचही मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसात ३८७ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मानकर यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

गडचिरोली –चिमूर लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी १४ तर २१ मार्च रोजी ३२ असे आतापर्यंत एकूण ४६ नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी १३ तर २१ मार्च रोजी १९ असे आतापर्यंत एकूण ३२ नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी ७९ तर २१ मार्च रोजी ३० असे आतापर्यंत एकूण १०९ नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. नागपूर लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी ८२ तर २१ मार्च रोजी ५९ असे आतापर्यंत एकूण १४१ नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले. रामटेक लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी २८ तर २१ मार्च रोजी ३१ असे आतापर्यंत एकूण ५९ नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आले

विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

होळी सणानिमित्त २४ व २५ मार्च रोजी शहर बस सेवा बंद

Thu Mar 21 , 2024
नागपूर :- सर्वत्र होळीचा सण येत्या रविवार २४ आणि सोमवार २५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशात होळी सणानिमित्त रविवार २४ मार्च रोजी सायंकाळी ०७.०० वाजता पासून ते सोमवार २५ मार्च रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण दिवस शहर बस सेवा बंद राहणार आहे. तर मंगळवार २६ मार्च रोजी सकाळी ६.०० वाजता पासून बसेसची वाहतूक पुर्ववत सुरु होईल अशी माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com