कुवारा भिवसेन येथील दारू अड्डयावर धाड

 – स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई

नागपुर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीतील मौजा कुवारा भिवसेन यात्रे दरम्यान अमित भलावी नावाचा इसम हा त्याचे घरासमोर अवैधरित्या बिनापरवाना देशी दारू बाळगुन विक्री करीत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सदर पथकाने सापळा रचुन छापा टाकला असता अमित शंकर भलावी, वय 25 वर्ष, रा. कुवारा भिवसेन याचे ताब्यात एकुण 121 नग देशी दारूच्या सिलबंद निपा, एकुण किं. 9,680/-रू चा माल अवैधरित्या बिनापरवाना मिळुन आल्याने सदर माल त्याचे ताब्यातुन जप्त करून आरोपीं विरूध्द अप.क्र. 146/2022 कलम 65(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस ठाणे पारशिवनी करीत आहे. सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार राजू रेवतकर , गजेंद्र चौधरी, नापोशि विपीन गायधने, अमोल वाघ, रोहन डाखोरे, चालक अमोल कुथे यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुणाल कुमार यांनी घेतला शहरातील स्मार्ट सिटीच्या विकास कामांचा आढावा

Tue Apr 26 , 2022
मनपा प्रशासक तथा आयुक्तांनी दिली स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती : कमांड अँड कंट्रोल सेंटरची केली पाहणी नागपूर, ता. २६ : केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर  कुणाल कुमार यांनी मंगळवारी (ता. २६) नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागपूर शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पोलिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com