– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची धडक कार्यवाही;एकाच दिवसात अवैध दारू भट्टीचा नष्ट करून गुन्हयात पाहिजे असलेले आरोपी गजाआड केले.
नागपुर – नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस निरीक्षक राहुल मागणीकर आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वातील पोलीस पथकाने धडक कार्यवाही करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम राबवुन एकाच दिवसात अवैध दारूभट्टी गाळणारे आरोपी व गुन्हयामध्ये पाहिजे असलेले आरोपी यांना गजाआड केले.
दि.08.02.2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक उपविभाग रामटेक अंतर्गत अवैध धंदयावर आळा घालणेकामी पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडुन माहिती मिळाली की पोस्टे पारशिवनी हद्दीतील शिलादेवी शिवारातील इसम नामे अमर नैकाम हा आपले शेतात लोखंडी ड्रम लावुन मोहाफुल गावठी हातभट्टी लावुन अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू गाळत आहे. अशा खबरेवरून मा. पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा. यांचे आदेशाने शिलादेवी शिवार येथे आरोपी चे शेतात छापा (raid ) कार्यवाही केली असता आरोपी अमर अच्छेलाल नैकाम वय 29, वर्षे रा. शिलादेवी हा मोहाफुल गावठ हातभट्टी लावुन अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू गाळतांना मिळुन आल्याने याचे ताब्यातुन 2300 मोहाफुल सडवा रसायण कि. 2,30,000/- रू. 60 लि.मोहाफुल दारू 12,000/- व मोहाफुल गावठी दारू गाळण्याचे साहित्यासह असा एकुण 2,45,900/- रू चा माल जप्त करण्यात आला. आरोपी अमर अच्छेलाल नैकाम वय 29, वर्ष रा. शिलादेवी चे विरूध्द पोस्टे पारशिवनी येथे महा.दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाही करीता पोस्टे पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, राजेंद्र रेवतकर, पोलीस नाईक रोहण डाखोडे, विपीन गायधने, अमोल वाघ यांचे पथकाने पार पाडली.