नागपूर :-नवीन वर्ष २०२३ च्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंगलमय शुभेच्छा देऊन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नंबर एक करण्याचा दृढ संकल्प करावा तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले
आज नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूदेव सेवा आश्रम, नागपुर येथे नववर्ष 2023 निमित्त पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी नागपूर शहरातील विविध समस्यांवर व पक्ष संघटनेवर सविस्तर चर्चा केली.
खासदार प्रफुल पटेल पुढे म्हणाले की, संपुआ सरकारच्या काळात विदर्भातील युवक युवतींना रोजगार देण्यासाठी मिहान प्रकल्प आणण्याचे काम आम्ही केले, आताच्या केंद्रातील सरकारने मिहानकडे दुर्लक्ष केल्याने आता युवकांच्या हाताला काम नाही त्यांना विदर्भाच्या बाहेर रोजगारासाठी जावे लागते. युवकांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत येणाऱ्या काळात आम्हाला संधी द्या. नागपूर महानगर पालिकेत बऱ्याच वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. नागपूर शहरात अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत. जनतेत त्या समस्या विरुद्ध रोष आहे. आपण सर्व मिळून जनतेचे प्रश्न मार्गी लावून आपण नागपुरात पक्ष मजबूत करू पक्षाच्या पदाधिकऱ्यांनीही पक्ष मजबूत करण्याची जवाबदारी घ्यावी. आगामी काळात कार्यकर्त्यांना कर्तृत्वाच्या आधारावर संधी देण्यात येईल असे अभिवचन या प्रसंगी पटेल यांनी दिले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री सुबोध मोहिते, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, शिवराज बाबा गुजर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, ईश्वर बाळबुढे , दिनानाथ पडोळे, शब्बिर अहमद विद्रोही, विजय घोडमारे, प्रशांत पवार, आभाताई पांडे, अनिल अहिरकर, प्रवीण कुंटे पाटील, दिलीप पनकुले, जानबा मस्के,रमण ठवकर, जावेद हबीब, बंडू उमरकर, उज्वला बोडरे, दिनेश बंग, अविनाश गोतमारे, रश्मी कोडगुले,चंद्रशेखर चिकले, शेकर कोल्हे, आशिष पाटील,आशिष पुंड, लक्ष्मी सावरकर, अविनाश काकडे, अर्चना हरडे, वर्षा शामकुळे, गुलशन मुणियार, महेंद्र भांगे रिजवान अंसारी, नूतन रेवतकर, सतिश इतकेलवार, शैलेंद्र तिवारी, पुनम रेवतकर, तनुज चौबे,प्रशांत बनकर, राजा बेग, सुशांत पाली, त्रिवेदी, सुनील लांजेवार, सुनिता येरने, संजय वाणी, मोरेश्वर जाधव, जावेद खान,अशोक काटले, राजेश पाटील, अरविंद भाजीपाले, धनंजय देशमुख, दिनकर वानखेडे, आशुतोष बेलेकर, पुरुषोत्तम वाडिघरे, हरषद सिद्धीकि, रिंकू पाली, प्यारू भाई, देवेंद्र घरडे कादिर शेख, विनय मुदलियार, राकेश बोरीकर, बाळबुढे गुरुजी, निलेश बोरकर, विनोद कावळे, पिंकी शर्मा, संदीप डोरलीकर, अर्चना वाऊ, नंदकिशोर माटे, नितीन बाकडे, रेखा गौर, कनिजा बेगम, राजभान सकरवार, जाकीर शेख, विजयमाला रामटेके, उर्मिला राऊत, रेखा गौर, भारती गायद्यने, पप्पी भाई, नंदकिशोर माहेश्वरी, अरविंद मेश्राम, संतोष नरवाडे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांते नागपूर शहर च्या कार्यक्रमाला उपस्थित होते व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपथित होते.